जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी औसा नगर परिषद मार्फत घनकचरा व्यवस्थापन व कचरा लाख मोलाचा प्रदर्शनास भेट - latur saptrang

Breaking

Wednesday, September 28, 2022

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी औसा नगर परिषद मार्फत घनकचरा व्यवस्थापन व कचरा लाख मोलाचा प्रदर्शनास भेट



 जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी औसा नगर परिषद मार्फत घनकचरा व्यवस्थापन व कचरा लाख मोलाचा प्रदर्शनास भेट

औसा प्रतिनिधी :-
 आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 सोमवार रोजी जिल्हाधिकारी लातूर मा. श्री पृथ्वीराज बी.पी. यांनी औसा नगर परिषद मार्फत घनकचरा व्यवस्थापन व कचरा लाख मोलाचा प्रदर्शनास प्रत्यक्ष भेट दिली. दरम्यान अजीम विद्यालय चे विद्यार्थी सोबत संवाद साधला तसेच नगर परिषद औसा मार्फत घनकचरा व्यवस्थापन चे सविस्तर माहिती घेतली.
 तसेच घनकचरा व्यवस्थापन मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल स्वच्छ भारत अभियानचे शहर समन्वयक सौदागर ए.एम., स्वच्छता निरीक्षक शेख मेहमूद, बालाजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
 तसेच औसा शहरातील सर्व नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन नगर पालिका मार्फत करण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरणचे प्रदर्शन बघावे असे आव्हान केले.
या प्रदर्शनामध्ये मा.उपविभागिय कांबळे सर  तसेच मा.तहसीलदार भरत सुर्यवंशी मा.अजिंक्य रणदिवे  प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद औसा व न.प.अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment