दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
💁♂️ अखेर भारतात 'चित्ता' परतला :
तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.
📍 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडन दौरा करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं आहे.
💐 माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन :
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे.
😎 राजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले,
मंत्रीमंळ विस्तार होऊन किती दिवस झाले तरीही नवीन सरकारला अजून पालकमंत्री निवडता आले नाहीत. कारण नवीन सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत म्हणून त्यांनी अद्याप मंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली नाहीत. त्यांना जो विभाग मिळाला आहे, म्हणून नाराज झाले आहेत.
🗣️ अजित पवारांचा वेदांतावरून सत्ताधाऱ्यांना सवाल! :
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेदांतावरून लक्ष्य केलं. ते म्हणाले, आज 90 दिवस काही कमी नाहीयेय. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून LATUR SAPTRANG ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment