दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
👀 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी शिंदे सरकारकडून मागे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाआणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचं पत्र दिलं आहे.
🇮🇳 भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था :
जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका पाहायला मिळत आहे. ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटीशांचं राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे.
💁♂️ नितीश कुमारांना धक्का, पाच आमदार भाजपमध्ये :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूला आता मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे पाच आमदार सत्ताधारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपमध्ये सामील झालेल्या जेडीयू आमदारांमध्ये केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खौटे आणि थंगजाम अरुण कुमार यांचा समावेश आहे.
🌧️ परतीच्या पावसाचा दणका, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (109 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवण्यास सुरू झाले आहे.
🏏 वन डे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा बदला!
क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. झिम्बाब्वेने वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया टीमला 3 विकेट्सने पराभूत करुन विजय मिळवला. या विजयाचा आनंद आपार होता. कारण झिम्बाब्वे टीमला तिसऱ्यांना एवढा मोठा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया टीमने पहिल्यांचा फलंदाजी करून 141 धावा केला. लक्ष्याचा पाठलाग करत झिम्बाब्वेने 7 गडी गमावले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment