जिल्ह्यात मोठी खळबळ; नवरात्रीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने १००हून अधिक जणांना विषबाधा - latur saptrang

Breaking

Tuesday, September 27, 2022

जिल्ह्यात मोठी खळबळ; नवरात्रीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने १००हून अधिक जणांना विषबाधा

 




जिल्ह्यात मोठी खळबळ; नवरात्रीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने १००हून अधिक जणांना विषबाधा

बीड : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाली आहे. नाळवंडी, जुजगव्हाण, पोळवाडी आणि पाली गावातील ग्रामस्थांचा यात समावेश आहे. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. सध्या सर्वच रुग्णांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चार गावातील नागरिकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीये. अचानक शंभरहून अधिक रुग्ण आल्याने जिल्हा शैली चिकित्सक सुरेश साबळे यांनी देखील तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत स्वतः उपचार केले शंभरहून अधिक जण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे काही काळ त्यांची देखील तारांबळ उडाली.
मात्र, दरवेळेस सनावारांच्या तोंडावरच उपवासामुळे अनेक नागरिक भगर, साबुदाणा इत्यादी गोष्टी या मार्केटमधून किराणा दुकानावर आणत असतात. याच दरम्यान अनेक ठिकाणी सप्ताह अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपवासानिमित्त भगर किंवा साबुदाणा हे पदार्थ केले जातात आणि यातून असे प्रकार घडलेले वारंवार पाहायला मिळतात. मात्र, सणांच्या आणि उपवासाच्या वेळेला अन्न औषध विभागाने ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगरी स्टॉक केल्या जातात.

दरम्यान, या ठिकाणी अन्न औषध विभागाने जाऊन त्याची तपासणी करणे गरजेचे आहे, असं देखील आता नागरिकांतून बोललं जातं. मात्र, बीड जिल्ह्यात अन्न औषध विभाग फक्त नावालाच असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. काल झालेल्या या विषबाधेमुळे अनेक नागरिक अद्यापही बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत उलटी मळमळ आणि चक्कर असे प्रकार या ठिकाणी झालेले पाहायला मिळाले आहेत, यामध्ये महिलांचा जास्त समावेश असल्याचा पुढे आलं आहे.

No comments:

Post a Comment