मुंबई, दि. 27 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत.
मुंबई शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांची उपस्थिती राहणार आहे.
००००
पवन राठोड/उपसंपादक/27.9.22
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/7FpnYNU
https://ift.tt/WNU0uy3
No comments:
Post a Comment