मुंबई, दि. 15 :- परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या भवनाच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
बैठकीस आमदार मंगेश कुडाळकर, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (वित्त) शैला ए, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष श्री.मयुर देवळेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, परळ येथील संत रोहिदास भवन चर्मकार समाजबांधवांना विविध उपक्रम राबविण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्याअनुषंगाने या भवनासाठी भरीव निधी निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी या प्रकल्पाच्या कामासंदर्भातील माहिती सादर करण्यात आली तसेच वाढीव बांधकामाबाबतही चर्चा करण्यात आली.
परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. चर्मकार समाजातील बांधवांसाठी या भवनात कौशल्य विकासाच्या विविध योजना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थेमार्फत देण्यात आली.
—000—
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/LBQAoTm
https://ift.tt/I3vJKES
No comments:
Post a Comment