इमारतीचे उदघाटन आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मविभूषण मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते - latur saptrang

Breaking

Friday, September 16, 2022

इमारतीचे उदघाटन आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मविभूषण मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते

sharad pawar


     कोळगाव (ता.श्रीगोंदा) येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मविभूषण मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते, संस्थेचे चेअरमन मा.डॉ. अनिलजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य दिलीपराव वळसे पाटील साहेब व उत्तर विभागाचे अध्यक्ष, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा.श्री. भगीरथजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष मा.श्री. अरुणजी कडू पाटील साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.श्री. दादाभाऊजी कळमकर साहेब, मा.श्रीमती मीनाताई जगधने, आमदार मा.श्री. संग्रामभैय्या जगताप, आमदार मा.श्री. निलेशजी लंके, माजी आमदार मा.श्री. राहुलदादा जगताप, मा.सौ. प्रतिभाताई पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.श्री. बाबासाहेबजी भोस, मा.श्री. बाळासाहेबजी बोठे, मा.श्री. राजेंद्रजी फाळके, मा.श्री. राजेंद्रजी नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. घनशामजी शेलार, सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिवणकर, जनरल बॉडी सदस्य मा.श्री. अण्णासाहेबजी शेलार, मा.श्री. शिवाजीराव पाचपुते, मा.श्री. कुंडलिकराव दरेकर, मा.श्री. सुभाषशेठ गांधी, मा.श्री. बाजीरावजी कोरडे, इन्स्पेक्टर श्री. तुकारामजी कन्हेरकर, शिक्षणाधिकारी श्री. अशोकराव कडूस, मा.श्री. राजेंद्रकाका निंबाळकर, माजी प्राचार्य श्री. एम.एस. लगड, प्राचार्य श्री. एच.के. दांगडे, सर्व शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्कुल कमिटी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, स्थानिक मान्यवर, देणगीदार, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment