सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Friday, September 16, 2022

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १६ : कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी आहे.

या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण – एस.एस.सी. उत्तीर्ण., एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण आणि टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य. वयोमर्यादा ३० ते ५० वर्ष, मानधन रू. १७ हजार ८२३ दरमहा. अर्जाचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर असून मुलाखत २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन मेजर जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

त्यासाठी पत्रव्यवहार आणि संपर्काचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, एडब्लूडब्लूए डायमंड वसतीगृहाच्या पाठीमागे, कलीना मुंबई विद्यापीठ उत्तर गेट समोर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई – ४०००५५ दूरध्वनी – ०२२-३५०८३७१७, ई-मेल zswo_mumbaiupnagar@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा.

अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/hEyCPWn
https://ift.tt/erQd9nE

No comments:

Post a Comment