मुंबई, दि. 18 राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत जे.जे. कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार करत असल्याचे आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात आज जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजीव मिश्रा यांनी श्री. मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.
सिंहगड किल्ल्याच्या सुशोभीकरणात जे.जे. कला महाविद्यालयाचा सहभाग घेण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच कांदळवनांच्या कुंपणभींतींचे सुशोभीकरणही जे.जे. कला महाविद्यालयाने करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांत जे.जे. कला महाविद्यालयाचा कसा सहभाग असू शकतो यासंदर्भातही यावेळी चर्चा केली.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ICp4vSi
https://ift.tt/BLs57Vb
No comments:
Post a Comment