पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - latur saptrang

Breaking

Friday, September 30, 2022

पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३० : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो २०२२ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर नारडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकर, नारडेको महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूणवाल, नारडेको महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.

मुंबईकरांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणार

मुंबईतील वाहतूकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही वाढवायचा आहे. महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासार्हता आणली असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नैना – तिसरी मुंबई म्हणून ओळख

मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी मेट्रो, ट्रॉन्सहार्बर लिंक, कोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी  पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासक, गुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नारेडकोला आश्वस्त केले.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नारेडको यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच ओपन एकर्स या मासिकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

संजय ओरके/विसंअ/30.9.2022



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/fB9YUaC
https://ift.tt/Fiha4Nj

No comments:

Post a Comment