लातूर अॅटो एक्सपो-2022 ला भरभरून प्रतिसाद
8 हजार ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटीलातूर ः डीआर इव्हेंट अँड अॅडस आयोजित लातूर अॅटो एक्सपो 2022 चे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आले असून या अॅटो एक्सपोमध्ये 40 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. चार चाकी, दोन चाकी, इलेक्ट्रीक आणि डिझेल-पेट्रोल अशा विविध नामांकित या एक्सपोमध्ये सहभाग घेतला असुन लातूरकरांना एकाच छताखाली अनेक कंपन्यांच्या गाड्या तसेच तरूणांना आकर्षित करणार्या नाविण्यपुर्ण दुचाकी याठिकाणी उपलब्ध आहेत. लातूरकरांकडून या अॅटो एक्सपोला भरभरून प्रतिसाद मिळत असून ग्राहकांना अनेक कंपन्यांच्या नवनवीन मॉडेल तसेच आकर्षक स्कीम याठिकाणी उपलब्ध आहेत.
दि.14 ऑक्टोबर रोजी लातूरातील सर्व नामांकित कंपनीच्या डिलर्सच्या शुभहस्ते या एक्सपोचे उद्घाटन झाले. या एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांना लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवनवीन कंपनीच्या गाड्या पाहावयास व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या एक्सपोचे विशेष आकर्षण म्हणजे टोयोटा हायब्रीड या चारचाकी गाडीचे विशेष चर्चा आहे. तसेच तरूणांना आकर्षित करणारी महिंद्रा कंपनीची थार या इलेक्ट्रीक बाईकचे विशेष आकर्षण आहे. कालपासून 7 ते 8 हजार नागरीकांनी या एक्सपोला भेटी दिल्या. तर अनेकांनी आपल्या पसंतीच्या गाड्या बुकींगही केल्याचे समजते. ग्राहकांसोबतच विक्रेत्यांनाही लातूरकरांसाठी एक खुलं दालन उपलब्ध झाले आहे. ज्या ग्राहकांना गाडी खरेदी करावयाची आहे अशांसाठी जागेवरच कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या स्कीम, स्पॉट डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर आदिंचा फायदा ग्राहाकांना होत आहे.
लातूरकरांना एकाच छताखाली अनेक कंपन्यांच्या गाड्या व आकर्षक डिझाईन व विविध रंगातील चारचाकी व दोन चाकी गाड्या पाहावयास मिळत आहेत तसेच विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. या अॅटो एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या पसंतीची गाडी सहजपणे उपलब्ध होत असल्याने ग्राहकातून समाधान व्यक्त होत आहे. या एक्सपोच्या माध्यमातून चौकशी व ग्राहकांच्या माहितीचा डाटा उपलब्ध होत आहे. दि.16 ऑक्टोबर रविवारी सायंकाळपर्यंत हा एक्सपो सुरू राहणार असून लातूरकरांनी या एक्सपोला भेट देवून या मिळणार्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment