ठाणे, दि. १५ (जिमाका) : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज उपस्थिती लावली.
यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, भगवात कथाकार देवकीनंदन ठाकूर जी महाराज, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, भागवत कथेचे महत्व खूप आहे. पुढील पंचवीस वर्षे देशात अमृतकाल येणार आहे. पुढील सात दिवस व्यासजीच्या भागवत अमृत कथेचे मनःपूर्वक श्रवण करून लाभ घ्यावा.
यावेळी श्री. देवकीनंदन ठाकूरजी यांच्या हस्ते राज्यपाल महोदयांचा सत्कार करण्यात आला.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/qkevZ0u
https://ift.tt/QMl8PIi
No comments:
Post a Comment