मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ZUwNc7B
https://ift.tt/o2vbEJQ
No comments:
Post a Comment