मुंबई, दि.१४ : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, अभ्यासक व संशोधक हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/sfiO2mC
https://ift.tt/evBjNPM
No comments:
Post a Comment