मुंबई, दि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शनिवार दि. 8 ऑक्टोबर आणि सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण, अन्नसाखळी यासारख्या विविध विषयांवर दिलखुलास कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये, वन्यजीव आणि मानवाच्या सहजीवनाबद्दलही त्यांनी माहिती सांगितली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/4faGmDT
https://ift.tt/o06RzdY
No comments:
Post a Comment