🔎 राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार?
आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटाकडून संजय शिरसाट, अनिल बाबर, किशोर आप्पा पाटील, दिलीप लांडे, भरत गोगावले, संतोष बांगर, यामिनी जाधव, बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर तर भाजपकडून प्रवीण दरेकर, संजय कुटे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर, प्रसाद लाड, योगेश सागर, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, निलय नाईक, नितेश राणे आदींची नवे चर्चेत आहेत.
😇 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह अयोध्याचा दौरा करणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या काही दिवसांत अयोध्याला जाणार आहेत. ते आपल्या सर्व आमदारांना घेऊनच अयोध्याचा दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या दौऱ्याचे नियोजन सुरू असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात मुंबई, इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हा दौऱ्या ते करणार असल्याचे बोलले जात आहे.
😎 ठाकरे गटाची 2.5 लाख प्रतिज्ञापज्ञ बाद
खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी न्यायालयात पुराव्यासाठी विविध कागदपत्रे सादर केली आहे. पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत.यामध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 11 लाख प्रतिज्ञापत्र जमा केली होती. मात्र, ठाकरेंच्या गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
😊 अंगणवाडी ताईंना मिळणार 'गूड न्यूज'!
चिमुकल्यांना (0 ते 6 वयोगट) शाळेची गोडी निर्माण करून त्यांचा बौध्दिक विकास व्हावा म्हणून अंगणवाडी सेविका महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. अंगणवाडी ताईंचा दरवर्षीचा भाऊबीज मिळविण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होणार आहे. त्यांच्या मानधनात आता दोन-अडीच हजार रुपयांची मानधन वाढ प्रस्तावीत असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
🏏 वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिला राजीनामा
वेस्ट इंडीज टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पात्रता फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर आता संघाचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते वर्षाच्या शेवटची हे पद सोडतील. याबाबत सिमॉन्स म्हणाले की, 'हा पराभव समजण्यापलिकडचा आहे. मी चाहत्यांची माफी मागतो.'
No comments:
Post a Comment