🌧️ *पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप* :
पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.
🏥 *आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका* :
औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
😎 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी एकाच बॅनरवर*
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्याने पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जमा खात्यात जमा झाल्यानंतर लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा फोटो असलेला बॅनर लावल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
💥 *केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू* :
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी होते. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 जण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
🏏 *रॉजर बिन्नी झाले BCCIचे 36वे अध्यक्ष* :
माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 36 वे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या AGMमध्ये बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहेत. यासोबतच भाजपचे नेते आशिष शेलार यांची आता BCCIचे कोशाध्यक्ष म्हणून बिनविरोध नियुक्ती झाली आहे. BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment