दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
😊 ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा :
ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा, असे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप मंजूर केला नाही, असा आरोप लटके यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात केला. तर, ऋतुजा लटके यांच्याविरोधात कालच म्हणजे 12 ऑक्टोबररोजी पालिकेकडे एक भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. ही केस प्रलबिंत आहे, असे मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
⚖️ हिजाब बंदीबाबत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभेद :
हिजाब बंदीच्या मुद्यावरून सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टातील दोन सदस्यीय खंडपीठात निकालाबाबत मतभिन्नता असल्याचे दिसून आले. न्या. सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक हायकोर्टाचा निकाल अवैध ठरवला. तर, न्या. हेमंत गुप्ता यांनी हिजाब बंदीचा कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हिजाब बंदीचे प्रकरण तीन सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी जाणार आहे.
🗣️ आता पॉलिटेक्निकचं शिक्षण मातृभाषेतून मिळणार :
येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तकं मराठीतून मिळतील, त्यामुळं पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल, विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी डिव्हाईस देणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं.
😎 भाजप शहराध्यक्ष आत्महत्या प्रकरणाला कलाटणी :
भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी मंगळवारी गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. त्यांचे भाऊ बाळकृष्ण बियाणी यांनी पेठ बीड पोलिसांना दिलेल्या जबाबात पिस्तूल साफ करताना मिसफायर होऊन भगीरथ यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी जप्त केलेला बियाणी यांचा मोबाईल, मागवलेले कॉल डिटेल्स याआधारे पोलिस तपासाची दिशा ठरवणार आहेत.
👍 खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम :
"मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
No comments:
Post a Comment