मुंबई, दि. 17 : पर्यटनविषयक कामांचे काटेकोरपणे नियोजन करून कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
पर्यटन विकास समितीच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, प्रादेशिक पर्यटन विकास योजना, गड किल्ले आणि ट्रेकिंग पाँईट येथे बायोटॉयलेट्स उभारणे, बीच शॅक्स धोरणातंर्गत बीच फॅसिलिटेशन सेंटरची कामे, पर्यटनविषयक सोयी सुविधांची कामे, प्रस्तावित उपक्रम व कामे, राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करणे याशिवाय पर्यटनविषयक विविध विकास कामे नियोजनपूर्वक करा. कामांचे वेळापत्रक तयार करा आणि कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/17.10.22
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/yF9fnlq
https://ift.tt/F5WkC1L
No comments:
Post a Comment