लटकेंच्या राजीनाम्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव : - latur saptrang

Breaking

Wednesday, October 12, 2022

लटकेंच्या राजीनाम्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव :

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk 

latke


😎 लटकेंच्या राजीनाम्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव :


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. शिवसेना या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. नियमांनुसार, लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असून त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते असेही परब यांनी म्हटले. 


🗣️ सुषमा अंधारेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर :


सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर होय आम्ही गुन्हेगार आहोत आणि हा गुन्हा आम्ही वारंवार करणार, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली.


💥 हवाई दलाचं MiG-29 विमान कोसळलं :


भारतीय हवाई दलाचं मिग 29 (MiG 29K) फायटर जेट क्रॅश झालं. गोव्याजवळ मिग 29 विमानाचा अपघात झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे विमान क्रॅश होण्यापूर्वीच पायलटने स्वत:ची सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पायलटने उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. पायलटची स्थिती सध्या स्थिर आहे. मिग 29 फायटर जेट गोव्याजवळ उड्डाण करत असताना यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर फायटर जेट गोव्यातील समुद्राजवळ क्रॅश झालं.


💁‍♂️ भारत जोडो यात्रेचा 900 किमी प्रवास पूर्ण :


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा आज 35 वा दिवस आहे. 7 सप्टेंबरला तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून ही यात्रा सुरु झाली होती. आत्तापर्यंत 900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये सुरु आहे. कर्नाटक राज्यात 511 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा पूर्ण करणार आहे. आज चित्रदुर्ग जिल्ह्यातील छल्लाकेरे इथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.


⚡ हनीप्रीत बनली डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष :


डेरा सच्चा सौदा सिरसा प्रमुख राम रहीमची धर्मपुत्री आणि मुख्य शिष्य हनीप्रीतच्या आणखी एका वादात भर पडली आहे. डेरा प्रेमींच्या 'फेथ व्हर्सेस वर्डिक्ट'ने दावा केला आहे की, हनीप्रीतला गुप्तपणे डेराची उपाध्यक्ष आणि डेरा सच्चा सौदा व्यवस्थापनाची अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यासह हनीप्रीतला हळू-हळू गादीची वारस बनवले जात आहे.


No comments:

Post a Comment