दिपावली निमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटप - latur saptrang

Breaking

Tuesday, October 18, 2022

दिपावली निमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटप



 दिपावली निमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटप



नाशिक,दि.१८ ऑक्टोबर :- दिपावली निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार प्रमोद हिले यांनी तहसील कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माजी गटनेता प्रवीण बनकर, माजी नगरसेवक निसार लिंबूवाले, सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, अस्मानी संकटांमध्ये उद्भवणारी शेतीचे घटणारे उत्पन्न या चक्रातून वाढत जाणारा कर्जमाफी कर्जबाजारीपणा याला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले, अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची दिवाळीची गोड झाली पाहिजे. तसेच मागील दोन वर्षात येवला तालुक्यातील तीन वीर जवान शहीद झाले आहे. या तीनही वीर पत्नीसोबत आपली सद्भावना आहे. त्याचबरोबर कोविड काळात दोन बालकांचे छत्र हरवले आहे. या सर्वांना आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते साडीचोळी, घरातील लहान मुलांना कपड्यांचे वाटप करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.



येवला तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत मृत पशुधनाच्या मालकांना धनादेशाचे वाटप



यावेळी येवला तालुक्यात अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्या पशुधनाच्या मालकांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment