डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी; सुधीर मुनगंटीवार यांचा मच्छिमार बांधवांना दिलासा - latur saptrang

Breaking

Saturday, October 22, 2022

डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी; सुधीर मुनगंटीवार यांचा मच्छिमार बांधवांना दिलासा

मुंबई, दि. 21:मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नावेच्या डिझेल वर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश आज शासनाने जारी केले आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचना विभागाला दिल्या होत्या.

मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नावेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदानस्वरूपात केली जाते. मात्र गेल्या काही काळापासून हे अनुदान थकित असल्याबद्दल काही निवेदने मंत्री महोदयांना प्राप्त झाली होती. त्यावर कारवाई करत श्री. मुनगंटीवार यांनी विभागाला ही अनुदानाची थकबाकी लवकरात लवकर वितरित करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज शासनादेश जारी करण्यात आला असून थकबाकीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

या अनुदानापोटी 18.37 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या थकित निधीचे वितरण करण्यात येणार आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात थकबाकीच्या वितरणाचे आदेश जारी झाल्यामुळे मच्छिमार बांधवांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/DYPFd8B
https://ift.tt/8n32vSt

No comments:

Post a Comment