‘दिलखुलास’ कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत - latur saptrang

Breaking

Monday, October 10, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर उद्या मंगळवार दि. 11 ऑक्टोबर आणि बुधवार दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

रस्ता सुरक्षा, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना, रिक्षाचा सुरक्षित प्रवास, वाहतूक समस्या अशा विविध विषयांवर नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी या कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. ‘सुरक्षित प्रवास करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे’, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/eC7pwT0
https://ift.tt/u2RWCtA

No comments:

Post a Comment