राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु - latur saptrang

Breaking

Thursday, October 20, 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु

मुंबई, दि. 19 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात प्राप्त तक्रारीवरुन शासनाने समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पूढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये एमकेसीएलला विना निविदा परिक्षेसंदर्भातील काम देणे, परीक्षा विलंब, देयके अदा करणे याबाबत व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व प्रशासकीय प्रमुख म्हणून कुलगुरु, नागपूर विद्यापीठ यांची मुख्य जबाबदारी असल्याने या मुद्याच्या कार्यवाहीबाबत आठ दिवसांत कुलगुरु नागपूर यांनी खुलासा सादर करावा, असे शासनाने कुलगुरु नागपूर यांना कळविले आहे.

तसेच विद्यापीठातील विना निविदा काम देण्यात आले. या वित्तीय अनियमिततेबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, विद्यापीठ अधिनियम लेखा संहितेनुसार अधिकची चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

000

काशीबाई थोरात/विसंअ/



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/MmIohdO
https://ift.tt/UZsoeC6

No comments:

Post a Comment