पाचोरा येथे गद्दारांचा धिक्कार करत पाचोर्यात शिवसेनेतर्फे निवडणूक आयोगा विरोधात निषेध मोर्चा
सोयगाव ,(प्रतिनिधी / यासीन बेग ) :-निवडणूक आयोगाने घाईघाईने आमच्या पक्षाचे नांव शिवसेना व चिन्ह धनुष्यवाण गोठविले. वास्तविक पक्षाची आवश्यक ती माहिती वेळेच्या आत निवडणूक आयोगाकडे देण्यात आली होती. संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेवून पक्षाचे नाव शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण गोठविले. त्याबद्दल पाचोरा भडगांव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला.ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ४० सहकाऱ्यांचा जाहीर धिकारही करण्यात आला. महाराष्ट्राचा विकासासाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी, हिंदुत्वाचा रक्षणासाठी, शिवसेनाप्रमुख राहणार नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान करुन प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करुन महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली ती शिवसेना संपविण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनताजनार्दन त्यांची जागा दाखविल्याशिवाय छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राची भूमी फितूरांना क्षमा करणार नाही. या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देत निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध मोर्चात शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत, अरूण रूपचंद पाटील, अॅड. अभय पाटील, रमेश बाफना, दीपक पाटील, गोरख पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, शाम पाटील, माधव जगताप, संदिप जैन, प्रवीण पाटील, जिभाऊ पाटील, दत्ता जडे, दादा चौधरी, पप्पू राजपूत पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment