ईद-ए-मिलादुलन्नबी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
किल्ले धारूर (प्रतिनिधी)
ईद-ए-मिलादुलन्नबी निमित्त धारूर शहरा मध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, दोन वर्षाच्या कोविडच्या काळानंतर यंदा मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक कार्यक्रम, हिजामा कॅम्प, रक्तदान शिबिर, शांतता रॅली, घेऊन ईद-ए-मिलादुलन्नबी साजरी होत आहे, माजी नगरसेवक सय्यद हरून, आवेज कुरेशी, सय्यद शाकेर अली, या कमिटीचे मार्गदर्शक असून दिनांक 7 अक्टूबर 2022 शुक्रवार रोजी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम के.जी.एन. फंक्शन हॉल दुधीयागल्ली धारूर येथे संपन्न झाला, या रक्तदान शिबिराचा कार्यक्रमत धारूर शहरातील सर्व नागरिकांने मोठ्या संख्येने सहभाग घेतला या शिबिराचे आयोजक म्हणून ॲड. सय्यद साजेद, मुजाहिद मोमीन, शेख अकरमभाऊ, सय्यद अनवर, शेख मुबिन, अतिक मोमीन, शेख शाहिद, शेख आयुब, शेख शाहनवाज व धारूर ईद मिलादुन्नबी कमेटीचे सदस्य सर्व सदस्य उपस्थित होते
No comments:
Post a Comment