मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.याशिवाय समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवड पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले असून सदर परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/XoECaYu
https://ift.tt/0TpoPbg
No comments:
Post a Comment