मुंबई, दि. १: राज्यातील पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
श्री सिंह म्हणाले,राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचा आलेख दाखवत आहे. महाराष्ट्रात दि. 01 ऑक्टोबर 2022 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 218, अहमदनगर जिल्ह्यातील 146, धुळे जिल्ह्यात 28, अकोला जिल्ह्यात 253, पुणे जिल्ह्यात 92, लातूर मध्ये 13, औरंगाबाद 36, बीड 3, सातारा जिल्ह्यात 105, बुलडाणा जिल्ह्यात 178, अमरावती जिल्ह्यात 159, उस्मानाबाद 4, कोल्हापूर 81, सांगली मध्ये 15, यवतमाळ 2, सोलापूर 13, वाशिम जिल्हयात 18, नाशिक 4, जालना जिल्हयात 12, पालघर 2, ठाणे 19, नांदेड 13, नागपूर जिल्हयात 4, हिंगोली 1, रायगड 4, नंदुरबार 11 व वर्धा 2 असे एकूण 1436 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. उपरोक्त बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लंपी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री सिंह यांनी केले आहे.
000000000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/zcZpKt4
https://ift.tt/fCAjeaq
No comments:
Post a Comment