दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
🗣️ वारशाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडेंचें टीकाकरांना प्रत्युत्तर
वारशाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडेंनी टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंडे म्हणाल्या, मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही तर त्यांनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला त्यांचा वारसा मी चालवते. दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयींपेक्षा गोपीनाथ मुंडेंचा वारसा वेगळा आहे का? असेही पंकजा म्हणाल्या. मी शत्रूंविषयी वाईट बोलत नाही तर ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते त्यांच्याविषयी वाईट कसे बोलेल.
🤝 अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला हात :
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता शिवसेना विरुद्ध भाजप असा सरळ सामना होणार आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीत शिवसेनेला ठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची घोषणा केली आहे.
🧐 संभाजी भिडेंचं आमदार, खासदारांबद्दल वादग्रस्त विधान:
शिवप्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्रनंतर भाषण देताना संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आमदार, खासदार आणि लोकप्रितिनिधींबद्दल वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले, देशातील राजकीय नेते आणि लोकप्रितिनिधी हे मातृभूमीसाठी जगणाऱ्या माणसांमध्ये गणले जात नाहीत. हे प्रतिनिधी कामाचा पगार घेऊनही देशासाठी काम करताना दिसत नाहीत.
✈️ अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले:
अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही.
💁♂️ 'जगात देशाची विश्वसनियता व प्रतिष्ठा वाढली' :
विजयादशमीनिमित्त नागपुरातील रेशीमबाग येथे डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं. ते म्हणाले, देशाचे वजन वाढत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत आपण स्वावलंबी होत आहोत. अर्थव्यवस्था आता सुधारत आहे व तिची प्रगती होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात जगात आपले खेळाडू कर्तृत्व दाखवत आहेत. कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment