सकाळच्या टॉप घडामोडी : 21 ऑक्टोबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ PM मोदी 75000 तरुणांना नोकऱ्या देणार: मंत्रालय आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्ती, धनत्रयोदशीला देशाला करणार संबोधित
▪️ NEET UG 2022: NEET UG पहिल्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल 21 ऑक्टोबरला, तर दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी 2 नोव्हेंबरपासून
▪️ ब्रिटनच्या PM लिझ ट्रस यांचा राजीनामा: 45 दिवस पदावर राहिल्या, लिझ ट्रस म्हणाल्या- आश्वासने पूर्ण करू शकले नाही; खासदारांचा दबाव वाढला
▪️ 75 हजार पदभरतीचा मार्ग मोकळा: भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
▪️ MCA अध्यक्षपदाची निवडणूक: शरद पवार-आशिष शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष, संदीप पाटील पराभूत
▪️ शिंदे, फडणवीस, ठाकरे आज एकाच व्यासपीठावर: शिवाजी पार्कवर रंगणार 'मनसे'च्या दीपोत्सवाची मैफल, मुख्यमंत्री करणार उद्घाटन
▪️ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; पंचनामे नीट होतील हे पहावं, असा सल्लाही
▪️ शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकरी हिताच्या कोरड्याच गप्पा: ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ - नाना पटोलेंची टीका
▪️ नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर केल्यास लागेल एक्स्ट्रा चार्ज: कंपनी म्हणाली- OTT प्लॅटफॉर्म फ्यूचर्स, पासवर्ड शेअरिंगमुळे आमचे नुकसान होईल
▪️ भारत-पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये नेदरलँड्स सामील: नामिबिया संघ शेवटच्या सामन्यात UAE कडून 7 धावांनी पराभूत, श्रीलंका अव्वल
▪️ टीम इंडिया पाकला जाण्याबाबतचा निर्णय गृह मंत्रालय घेणार: क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले - खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय
▪️ मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर पोहोचली अमृतसरला: सुवर्ण मंदिरात टेकले डोके, लवकरच जॉन अब्राहमसोबत चित्रपटात दिसणार
No comments:
Post a Comment