लातूर शहरामध्ये सध्या डेंग्युचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे डेंग्युमुळेच पाच बालकाचा मृत्यु झालेला आहे. हे वास्तव असतानाही मनपाने डेंग्यूचा सामना करण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. अगोदरचा कोरोनाने आर्थिक गणित कोलमडलेल्या लातूरकरांना पुन्हा डेंग्यू या आजाराला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यामुळे लातूरकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागे करण्यासाठी लातूर महानगरपलिकेत हालकीच्या निनादात धूर फवारणी करून भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर व भाजयुमोचे प्रदेश सचिव अॅड.गणेश गोमचाळे, महात्मा बसवेश्वर मंडलाध्यक्ष संजय गिर यांच्या उपस्थितीत निदर्शने करून महानगरपालिकेच्या कामाबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेवून लातूर महानरगपालिकेने पावसाळ्यापुर्वीच गटारी साफ करण्याची मोहिम हाती घेणे गरजेचे होते. परंतु याकडे मनपाने लक्ष दिलेले नाही. गटारी साफ करण्याची मोहिम राबविण्याऐवजी कागदोपत्री चालविली. त्यामुळे लातूरकरांना डेंग्यु सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक वार्डामध्ये पाहिले तर तुंबलेल्या गटारी दिसून येतील सध्या महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर सर्वे झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये आठ दिवसाला पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा साठा असणे स्वाभविक आहे. बर्याच दिवसाचा असलेला पाण्याचा साठा डेंग्यूसाठी पुरक आहे. ते माहित असतानाही मनपाकडून अॅबेटिंगची फवारणी केली जात नाही. त्यामुळे नुकताच पाच बालकांचा डेंग्युमुळे मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने आतातरी लक्ष देवून डेंग्यू अजारावर उपाययोजना करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये अॅबेटिंगची फवारणी करावी. त्यामुळे डेंग्यू आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळेल. त्यामुळे लातूर मनपाने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याच्यावतीने भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनामध्ये करण्यात आली.
यावेळी या एकदिवशीय निदर्शने आंदोलनाला मंगेश बिराजदार, गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे,गजेंद्र बोकन, सागर घोडके, शंभूराजे पवार, अॅड.सचिन कांबळे, संतोष ठाकूर, संतोष जाधव, राहुल भूतडा, एस.एम.नांदे, रविशंकर लवटे, यशवंत कदम, अॅड.पंकज देशपांडे, संकेत गवळी, संतोष तिवारी, माधव गोमारे, सद्दाम शेख, रोहित करवंजे, आकाश आलापुरे, प्रेम मोहिते, ओम धरणे, ऋषि जाधव, दुर्गेश चव्हाण, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, आकाश जाधव, अविनाश डुमणे, सुरज ऊफाडे, सचिन सुरवसे, अमोल गित्ते, योगेश गंगणे, व्यंकटेश हंगरगे, महादेव पिटले, राजेश पवार, गोविंद सुर्यवंशी, गणेश गुडमे, बालाजी पाचंगे, अॅड.किशोर शिंदे, धनु आवस्कर, ईश्वर सातपुते, सुनिल राठी, आकाश पिटले, ओमराजे पवार यांच्यासह भाजपा युमोच्या पदधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वैद्यकीय मंत्री लातूरचे असतानाही नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सध्या लातूर शहरामध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी पाच पालकांचा मृत्यु झालेला आहे. लातूूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनाही या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त पर्यटनाला आल्यासारखे ते लातूरला येतात. यामुळे लातूरकरांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री लातूरचे असतानाही नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या कामकाजाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हालकीच्या निनादात मनपामध्ये धुर फवारणी करण्यात आली. त्यामुळे आतातरी महानगरपालिकेने लक्ष देवून शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न मार्गी लागावा अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, असा ईशाराही भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यावेळी बोलताना दिला.
No comments:
Post a Comment