नवी दिल्ली : भारताला करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभावतोय. याच दरम्यान आज (बुधवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात मंगळवारी (३१ ऑगस्ट २०२१) ४१ हजार ९६५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ४६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत.एकूण रुग्णांपैंकी केवळ केरळमध्ये काल ३० हजार २०३ रुग्ण आढळले तर ११५ जणांच्या मृत्यूची नोंद झालीय. गेले पाच दिवस देशात सलग ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते. बुधवारी ४६ हजार १६४, गुरुवारी ४४ हजार ६५८, शुक्रवारी ४६ हजार ७५९, शनिवारी ४५ हजार ०८३ तर सोमवारी ४२ हजार ९०९ करोना रुग्ण आढळले होते. या रुग्णसंख्या वाढीत केरळमध्ये वाढलेली रुग्णांची संख्येचाही हातभार आहे.याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ०२० वर पोहचलीय.देशात सध्या ३ लाख ७८ हजार १८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३३ हजार ९६४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर
क्लिक करा आणि वाचा- सुस्त मनपाला जागे करण्यासाठी भाजयुमोेकडून धुरफवारणी भाजयुमोचे निदर्शने ः डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविला अनोखा उपक्रम
No comments:
Post a Comment