भारत देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस या सुखद योगायोग निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी भाजपाच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅलीचे नियोजन करून यशस्वी करावी असे आव्हान भाजपाचे प्रदेश गांधी जयंती अभियान प्रमुख बसवराज मंगरुळे यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या लातूर ग्रामीण आणि शहर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या बैठकीत बोलताना मंगरुळे यांनी आवाहन केले बैठकीत प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी लातूर जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार केला. भाजपाच्या वतीने सुरू असलेल्या सेवा आणि समर्पण अभियाना बाबत सविस्तर माहिती देऊन स्वच्छता, आत्मनिर्भर भारत, खादी सह स्थानिक उत्पादनाचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत मंगरुळे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, औरंगाबाद येथील दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, किरणआप्पा उटगे, शिवाजीराव केंद्रे मनीष बंडेवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, सभापती रोहिदास वाघमारे, ओबीसी मोर्चाचे बापूराव राठोड, मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी जयश्री पाटील, पंडितराव सूर्यवंशी संध्या जैन, शिरीष कुलकर्णी, प्रदीप मोरे हनुमंत बापू नागटिळक दिलीप धोत्रे शोभा पाटील प्रवीण सावंत यांच्यासह लातूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment