रेणापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी कारेपूर पंचायत समितीच्या सदस्या बायनाबाई साळवे यांची आज बुधवारी अविरोध निवड झाली निवड होताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल बायनाबाई साळवे यांनीही आ रमेशआप्पा कराड यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, पंस सदस्या पंचफुला घुले, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, सिद्धेश्वर मामडगे, श्रीकृष्ण पवार, भाऊसाहेब गुळबिले, आशिष काळे संतोष चव्हाण, राजेश काळे, किरण मुंडे यांच्यासह अनेक जण होते
No comments:
Post a Comment