डोंबिवली; : मुंबईतील साकी नाका बलात्कार प्रकरणावरून राज्यांतील महिला सुरक्षेवरून अब्रूचे धिंडवडे निघत असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे.
अल्पवयीन तरुणींवर तब्बल ३३ नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मुळापासून हादरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बलात्कार गुन्ह्यात आरोपी असण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
केसमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना गजाआड करण्यात यश मिळविले असून अटक आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. या अत्याचारकांडातील अन्य 10 जण अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.
मित्राकडून फसगतीची सुरूवात
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तक्रारदार पीडित मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे या तरूणाने तिला लग्नाचे अमिष दाखवले होते.
त्यानंतर दुसऱ्या मित्रानेही तिच्यावर अशाच पद्धतीने अत्याचार करून व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत अन्य बदमाश्यांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.
Dombivli rape : पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव वा हस्तक्षेप नाही
या संदर्भात माहिती देताना कल्याण प्रादेशिक पूर्व विभागाचे अपर आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव वा तपासात हस्तक्षेप नाही. 29 आरोपींची नावे सांगणाऱ्या तक्रारदार मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती सुस्थितीत आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे.
Dombivli rape : शालिनी ठाकरे संतापल्या
या घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे.
दिल्ली, उत्तरप्र देशपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे ? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment