डॉ. पुष्पलता पुरुषोत्तम अग्रवाल यांचा जन्म दि. 12.01.1970 रोजी अकोला येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. बी.ए. पर्यंतचे शिक्षण त्यांनी अकोला येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम.ए. करिता दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतला व एम.ए. हिंदी विषयात विद्यापीठातून सर्व द्वितीय आल्या होत्या. विवाहा नंतर सर्वसाधारण अर्थिक परिस्थितीवर मात करून त्यांनी बी.एड, एम.फिल. व पीएच.डी. पदवी प्राप्त केली . 2003 मध्ये त्या पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून दयानंद कला महाविद्यालयात रूजू झाल्या.त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. जसे राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, वेळापत्रक समिती, युवती कल्याण मंडळ इत्यादी समित्यावर काम करत असतांना त्यांनी महाविद्यालयातील युवतींसाठी वेग वेगळया कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थींनी मध्ये आत्मविश्वास जागवण्याचे काम केले.
महाविद्यालयात त्या मितभाषी व विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांची ख्याती होती. म्हणतात ना “जो आवडे सर्वांना तोची आवडे ईश्वराला” ह्या उक्ती प्रमाणे त्या कॅन्सरसारख्या दूर्धर आजाराने दि. 22.04.2021 रोजी अनंतात विलीन झाल्या.
त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जिवलग मैत्रीणी प्राचार्या पूनम नाथानी, प्राचार्या क्रांती सातपुते, प्रा मेघा पंडित, डॉ. अनुराधा सावरीकर, यांनी प्रत्येकी – 2500/- असे एकुण – 10,000/- अनामत जमा केली आहे. सदर रक्कम बँकेत जमा करून येणाऱ्या व्याजावर डॉ. पुष्पलता अग्रवाल यांच्या नावाने दर वर्षी बी.ए. तृतीय वर्गात हिंदी विषयास सर्वाधीक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यास रु. 1000/- ची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या स्तुत्य उपक्राबद्दल दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष मा. अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, हिंदी विभाग प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी आदिनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment