अमरावती : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेला भाव आता तब्बल सहा हजारांनी घसरलेला आहे. व्यापाऱ्यांनी षड्यंत्र रचून भाव पाडल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला दहा हजारापर्यंत भाव होता तर आता सोयाबीन कापणीला वेग आलेला आहे तर हळूहळू आता शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजार समिती सुद्धा विक्रीला जात आहे.
असं असलं तरी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजार समितीत दाखल होताच व्यापारांनी भाव पाडले व आता सोयाबीनला केवळ चार ते पाच हजार रुपये भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. नगदी पीक अर्थात सोयाबीनचे पिकाकडे पाहिले जाते. सोयाबीन नंतर या क्षेत्रात हरभरा किंवा गव्हाचे पीक घेतले जाते.
तीन महिन्यात निघणार हे नगदी पीक आहे. मात्र, खाद्यतेलाचे आयात शुल्क २५ टक्केपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरात कमी येत आहे. पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र हे ११ लाख ४६ हजार हेक्टर आहे तर २ कोटी २९ लाख २० हजार हेक्टरवर उत्पन्न अपेक्षित आहे. तर जुलै ऑगस्ट मध्ये सोयाबीनला १० हजार मिळालेला भाव हा व्यापारी वर्गाला मिळाला. कारण, त्यावेळी शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते. मात्र, आता सोयाबीन बाजार पेठेत दाखल होण्याची वेळ आली असतांना सोयाबीनचे भाव घरसले. त्यामुळे १० हजार रुपये भाव सोयाबीनला मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
No comments:
Post a Comment