सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दोनदिवसीय औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर - latur saptrang

Breaking

Friday, September 24, 2021

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दोनदिवसीय औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर

मुंबईदि. 24 : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे उद्यादि. २५ आणि परवा २६ सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात येईल.

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असूनत्यानंतर दुपारी १ वाजता केंब्रिज ते सावंगी आणि कुंभेफळ ते टाकळी या रस्त्यांचे भूमिपूजनकुंभेफळ येथे १४ व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या महिला व बालकांच्या सुसज्ज रुग्णालय इमारतीचे लोकार्पण श्री. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. ५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या औरंगाबाद शहरातील मिल कॉर्नर ते बीबी का मकबरा लेणी रस्त्याचे भूमिपूजन सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार असूनदक्षता व गुणनियंत्रण मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन श्री. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे ३० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या तुळजापूर-बिहामांडवा-डोणगाव या रस्त्याचे तसेच ७ कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विहामांडवा-नवगांव-आपेगाव रस्त्याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २.३० वाजता करोडी फाटा येथे ५३ कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या शरणापूर-शाजापूर रस्त्याचे भूमिपूजनही श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वा. लोकशाही’ वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मराठवाडा रत्न पुरस्कार’ सोहळ्यास श्री. अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

०००००

किशोर गांगुर्डेविभागीय संपर्क अधिकारी२४ सप्टेंबर २०२१



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3i01jO7
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment