लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळित - latur saptrang

Breaking

Monday, September 13, 2021

लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळित


 

latursaptrang

लातूर/प्रतिनिधी: तांत्रिक बिघाडामुळे खंडित असणारा लातूर शहराचा पाणीपुरवठा रविवारी (दि.१२सप्टेंबर) सायंकाळपासून पूर्ववत सुरु झाला आहे.ज्या भागांपासून  पाणीपुरवठा खंडित झाला होता तेथून तो पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

    धनेगाव पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन मध्ये दोन दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता.ही बाब लक्षात आल्यानंतर मनपाच्या वतीने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.दुरुस्ती करून त्याची चाचणी घेत असताना सायंकाळी परत दुसरे फायबर शीट व सिटी बस्ट झाले.त्यामुळे त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यात आली.दुरुस्तीची ही सर्व कामे रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. रविवारी सायंकाळी ६.५० वाजता दुरुस्ती पूर्ण होऊन पाणी उपसा पूर्ववत करण्यात आला.त्यानंतर शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

   गौरी-गणपतीचे दिवस लक्षात घेता मनपाच्या वतीने सबस्टेशन मध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले.नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळीही दुरुस्तीची कामे करत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.पाणीपुरवठ्या मध्ये दोन दिवसांचा खंड पडला होता. ज्या भागापासून पाणीपुरवठा खंडित झाला होता तेथून तो पुन्हा एकदा पूर्ववत झाला असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.




No comments:

Post a Comment