*सेवादल रविमिलन चिंतन बैठक संपन्न* - latur saptrang

Breaking

Monday, September 13, 2021

*सेवादल रविमिलन चिंतन बैठक संपन्न*




latursaptrang


 श्रमदान करणारे सेवापथक निर्माण करुन सामाजिक कार्य करणे, भारतातील अष्टपैलू संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलापथक प्रबोधनात्मक कार्य करण्यासाठी आज लातूर शहराचे जिल्हा काँग्रेस सेवादलच्या पुढाकाराने युवकांचे प्रशिक्षण करणारी अभ्यास व चिंतन बैठक "रवि मिलन" ही पश्चिम झोन मध्ये आयोजित करण्यात आली.  युवकांमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी सेवादलाच्या विविध‌ सेवादल, महिला सेवादल, यंग ब्रिगेड च्या पदाधिका-यांनी या  बैठकीत सहभाग नोंदविला.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष सुपर्ण जगताप म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात व तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या उभारणीमध्ये सेवादलाचे खूप मोठे योगदान  आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे आणि पालक मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य पक्षासाठी कष्ट करणाऱ्या काँग्रेसच्या सैनिकाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे .त्यासाठी दर आठवड्याला रविमिलन या प्रभागवाईज, गाववाईज बैठकीच्या माध्यमातून व सेवादल शाखांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
या बैठकीला सरचिटणीस डॉ शिवाजी मोहाळे , सेवादल‌ उपाध्यक्ष भीमाशंकर झुंजारे, यंग ब्रिगेडचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष बंडू सोलंकर, अॅड चिकटे ,अनिल चिकटे, सोशल मीडिया प्रमुख प्रा एम पी देशमुख ,यंग ब्रिगेड कार्याध्यक्ष मुनव्वर शेख, अमरदिप गुंजोटे, नितीन पुंड, लातूर ग्रामीण सोशल मिडिया चे नरेश पवार ,सेवा संघाचे पद्माकर वाघमारे, नेताजी जाधव , पूर्व सेवादल म्हाडा शाखा प्रमुख उत्तमराव सप्काळ,उत्तर ब्लाॅक अध्यक्ष प्रा शहाजी चव्हाण, खंडापुर शाखा प्रमुख दिपक कैले, हरंगुळ शाखा प्रमुख विजयकुमार झुंजे, सचिन साखरे, प्रा साळुंके व सेवादलाचे अनेक स्वयंसेवक हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment