मुंबई, दि. 28 : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
सिंगापूरची स्वतःची गृहबाजारपेठ नसल्यामुळे मुंबईतील आपल्या कार्यकाळात सिंगापूर व भारतातील आर्थिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे नवे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी राज्यपालांना सांगितले. भारतातील अनेक विद्यार्थी सिंगापूर येथे उच्च शिक्षण घेत असून सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा कल मात्र इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शिक्षण घेण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेल्याचे मावळते वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपालांना सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे आपण प्रशिक्षण घेतले असल्यामुळे संपूर्ण भारत आपल्या परिचयाचा असल्याचे गेविन चॅय यांनी सांगितले.
यावेळी सिंगापूरचे मुंबईतील उप वाणिज्यदूत (राजकीय) झॅकेयुस लिम उपस्थित होते.
००००
Newly appointed Singapore Consul calls on Governor
Outgoing CG Gavin Chay makes a farewell call
Mumbai Dated 28 : The newly appointed Consul General of the Republic of Singapore in Mumbai Cheong Ming Foong accompanied by the outgoing Consul General Gavin Chay called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Monday (27 Sept).
Cheong Ming Foong told the Governor that he will endeavor to step up economic cooperation between Singapore and India during his tenure. The outgoing Consul General Gavin Chay briefed the Governor of his successful stint in India and his visits to various parts of India. Zacchaeus Lim, Vice Consul (Political) in the Singaporean Consulate was also present.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2ZxGtiN
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment