लातूर : रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई रोड वरील मातोश्री वृद्धाश्रमाला २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष रो. राजगोपाल मुंदडा, सचिव रो. डॉ. संजय वारद , संस्थापक अध्यक्ष रो. संजय बोरा, विश्वनाथ पंचाक्षरी, रो. नंदकिशोर लोया यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त यावेळी महापौरांच्या उपस्थितीत क्लबच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्ष २०२० - २१ चा अवॉर्ड प्रदान सोहळाही उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे संयोजक रो. राजेंद्र सुराणा हे होते. यावेळी रो. गिरीश ब्याळे , रो. गिरीश गारटे , रो. चंद्रशेखर खानापुरे , रो. पुरुषोत्तम सोनी, रो. लक्ष्मीकांत सोनी, रो. चंद्रकांत गुंडरे , रो. मन्मथ पोपडे, रो. संजय बावगे, रो. द्वारकादास मंत्री यांसह मातोश्री वृध्दाश्रमातील आजी - आजोबा, इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment