राज्यात मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना धोका, चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा - latur saptrang

Breaking

Monday, September 27, 2021

राज्यात मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना धोका, चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा





 मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. मात्र, त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याने राज्यामध्ये याचा काही ठिकाणी परिणाम पाहायला मिळणार आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Weather Alert Cyclone threat to many districts in the state including Mumbai and Pune warning of heavy rains)


सोमवारी चंद्रपुरासाठी ‘रेड अॅलर्ट’ आहे. तर मंगळवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव येथे रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

इतकंच नाहीतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'पुढचे २, ३ दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या, काही ठिकाणी तीव्रता जास्त असेल.' असा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी आज, सोमवारी मुसळधार पाऊस असेल. मात्र, हा जोर मंगळवारी वाढण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि रायगड येथे तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. मुंबईमध्ये तसेच रत्नागिरीमध्येही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. (Weather Alert Cyclone threat to many districts in the state including Mumbai and Pune warning of heavy rains) 

धुळे, जळगावमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार, औरंगाबाद, नगर आणि पुणे, नाशिक जिल्ह्यांतील घाट परिसर येथे घाट परिसरामध्ये तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भातील पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मात्र, उर्वरित विदर्भामध्ये पावसाचा जोर फार नाही. रविवारच्या अंदाजानुसार विदर्भात अगदी मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकेल.

गुरुवारी जोर कमी होणार?

मुंबई, ठाणे, पालघर येथे बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. या काळात विजाही चमकू शकतील. नंदुरबार, औरंगाबाद, जालना आणि नाशिकचा घाट परिसर येथे पावसाचा जोर असेल. उर्वरित महाराष्ट्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. गुरुवारी राज्यात सर्वदूर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. (Weather Alert Cyclone threat to many districts in the state including Mumbai and Pune warning of heavy rains) 


विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला मार्गदर्शक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
 मुरुडमध्ये २ हजार शेतकऱ्यांनी दिले मिस कॉल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोहिमेला प्रतिसाद

No comments:

Post a Comment