लातूर जिल्ह्यातील सात तालुक्यांत अतिवृष्टी - latur saptrang

Breaking

Thursday, September 30, 2021

लातूर जिल्ह्यातील सात तालुक्यांत अतिवृष्टी

लातूर : जिल्ह्यात दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ६६.९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १०९ टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सात तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.
गेल्या सहा-सात दिवसांपासून लातूर जिल्ह्यात दररोज दमदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प तावरजा, रेणा, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प व १३२ लघू असे एकुण १४२ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा होणारे मांजरा धरण १०० टक्के भरल्याने या धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १४५ किलो मीटरची मांजरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या नदीवरील १५ बराजचे दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीला पुर आला आहे. त्यामुळे नदीकाठ्या हजारो हेक्टर शेत-शिवारांतील खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. रविवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लातूर, औसा, रेणापूर, अहमदपूर, चाकुर, उदगीर, जळकोट या सात तालुक्यांत अतिवृष्टी झाली.जिल्ह्यात दि. २८ सप्टेंबर रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच १ जून ते २८ सप्टेंबरपर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. (आकडेवारी मि. मी. मध्ये) लातूर-८२.७ (९२०.८), औसा-६४.४, (८५२.४), रेणापूर ६३.३, (९८५.५), अहमदपूर – ८२.७ (१०५७.३), चाकूर- ७२. ०, (९११.८), उदगीर-६९.७, (९७२.९), जळकोट- ७५.७, (१०४१.४), निलंगा-४८.८, (७७९.२), देवणी- ४५.०, (८२०.३) व शिरुर अनंतपाळ- ५७.९ (८२०.३) मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत झालेला पाऊस ९०६.९ मि. मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या १०९.५ टक्के आहे.

No comments:

Post a Comment