औरंगाबाद- गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.29) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यात मागील दोन दिवसात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरी
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात जवळपास 21 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचेच पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नवीन नुकसानीचे पंचनामे कधी होणार?, अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment