स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे






 लातूर/प्रतिनिधी:आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेवर जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्याचं काम लातूर शिवसेना करेल असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.शिवसेना पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा,घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून पक्षाला बळ द्यावे,असेही ते म्हणाले.

  मंगळवारी चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे  शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खैरे  यांच्या हस्ते १५० कार्यकर्त्यांनी यावेळी सेनेत प्रवेश घेतला.
जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या प्रयत्नातून हे प्रवेश झाले.
  खैरे म्हणाले की,भाजपा निव्वळ बेगडी हिंदुत्व घेऊन जनतेसमोर जात आहे पण शिवसेना हिंदुत्व कधीही सोडणार नाही.पुढील आठ महिन्यांमध्ये प्रत्येक शिवसैनिकाने पक्षासाठी निष्ठेने काम करून पक्ष संघटन मजबूत करून लातूर महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर परिषद व नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याची तयारी ठेवावी, असेही खैरे म्हणाले. 
  शिवाजी माने यांची नियुक्ती झाल्यापासून लातूरच्या शिवसेनेस नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे समाधान यावेळी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.शिवाजी माने यांच्यावर या सर्व निवडणुकांची जबाबदारी असल्याने त्यांच्या पाठीशी सर्व शिवसैनिकांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
  जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसंपर्क अभियान संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आले.यातून १३१ गावांमध्ये शिवसेना पोचविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर, विनोद आर्य, शहर प्रमुख रमेश माळी, किसन समुद्रे, माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, पप्पू भाई कुलकर्णी, महिला संघटिका सुनिता चाळक युवा उपजिल्हा प्रमुख राहुल मातोळकर यूवासेना विस्तारक प्रा सुरज दामरे, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, सतिश शिंदे, अविनाश रेशमे भागवत वंगे, माजी नगरसेवक शिवसैनिक सतिश देशमुख, प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर, ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे
 यासह अन्य पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक  उपस्थित होते

No comments:

Post a Comment