महाबळेश्वर येथील पीडितेला मनोधैर्य योजनेतून मदत देणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे - latur saptrang

Breaking

Monday, September 27, 2021

महाबळेश्वर येथील पीडितेला मनोधैर्य योजनेतून मदत देणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा, दि. 27 : महाबळेश्वर येथील अत्याचार पीडितेला मनोधैर्य योजनेतून मदत करण्यात येणार असून या प्रकरणांतील दोषींची गय केली जाणार नाही, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी सांगितले.

सातारा येथील पत्रकार परिषदेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अत्याचाराची घटना संतापजनक असून पीडितेला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या असून पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण पोलीस संरक्षण देण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/39F2PB1
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment