मांजरा धारण ओव्हरफ्लो, अठरा दरवाजे उघडले - latur saptrang

Breaking

Tuesday, September 28, 2021

मांजरा धारण ओव्हरफ्लो, अठरा दरवाजे उघडले

 


कळंब :  लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख ज लस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी (दि. २१) दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र सतत च्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे धरणाचे आठरा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

    मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी आठरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला आहे, मुसळधार पावसामुळे शेतीचे,घराचे मोठ्या प्रमनावर नुकसान झाले आहे. नागरिक मध्ये भीतीचे वातावरण आहे.नदीकाठच्या नागरिकांना हलविण्याची गरज आहे.

दरम्यान, सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही वरुणराजा दमदार बरसल्याने सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मांजरा प्रकल्प प्रथम 1980 साली 97 दलघमी पाणी साठा झाला,या नंतर 1988 मध्ये हे धरण प्रथम भरला.पुढे 1989,1990 असे सलग दोन वर्ष ओव्हर फ्लो झाला होता.2005,20060या साला सह 2010,2011,2016,2017 तसेच 2020 व 2021मध्ये पूर्ण संच य पातळी गाठली.1996,1998, या सह 2000,2008 व गत वर्षी 2020 मध्ये ओव्हर फलो झाला होता.अशा प्रकारे 14 वेळा पूर्ण पाणी साठा झाला आहे.
गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल राज्यपालांकडून सिंधी समाजाचा गौरव

No comments:

Post a Comment