पेट्रोल-डिझेल भडकले! पेट्रोलमध्ये २० तर डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ - latur saptrang

Breaking

Tuesday, September 28, 2021

पेट्रोल-डिझेल भडकले! पेट्रोलमध्ये २० तर डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ

 


     कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलर गेले, त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसाठी तेल आयातीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, कंपन्यांनी आज पेट्रोल दरात वाढ केली आहे. मंगळवारी देशभारत पेट्रोल २० पैशांनी महागले असून डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ झाली आहे. अशाप्रकारे पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल भडकले

डिझेलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाल्यामुळे माल वाहतुकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, डिझेलमध्ये रविवारी २५ पैशांची आणि सोमवारीही २५ पैशांची वाढ झाली होती. आज पुन्हा डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोलचे दर पेट्रोलियम कंपन्यांकडून स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, आज त्यामध्ये २० पैशांची वाढ करण्यात आली. मुंबईमध्ये १ लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये, दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये, चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये, कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये, भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८३ रुपये आणि बंगळुरात पेट्रोल १०४.९० रुपयांपर्यंत गेले आहे.

पेट्रोलच्या दलाचा विचार केला तर, आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपये, दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये, चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये झाले आहे. पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल भडकले.

तेलाचा भाव लवकरच ८० डाॅलरपर्यंत जाण्याची शक्यता

सोमवारी अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ७९.५३ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात १.४४ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७५.४५ डॉलर झाला. त्यात १.४७ डॉलरची वाढ झाली. सलग पाचव्या सत्रात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. लवकरच तेलाचा भाव ८० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.


मांजरा धारण ओव्हरफ्लो, अठरा दरवाजे उघडले

No comments:

Post a Comment