बचत गटाच्या महिलांना कोविड-१९ लसीकरण जाणीवजागृती व लसीकरण शिबीराचे आयोजन - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

बचत गटाच्या महिलांना कोविड-१९ लसीकरण जाणीवजागृती व लसीकरण शिबीराचे आयोजन





 

लातूर शहर महानगरपालिका लातूर, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सम्राट चौक लातूर येथे आज दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी प्रभाग क्रमांक ०५ गुरु रविदास भवन येथे बचत गटाच्या महिलांना कोविड-१९ लसीकरण जाणीवजागृती व लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात केले, मा.विक्रांत गोजमगुंडे यांनी उपस्थित बचत गटाच्या महिलांनी स्वतः लस घेऊन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करून लातूर शहर हे संपूर्ण लसीकरण युक्त करावे असे आवाहन केले तर अशा प्रकारचे शिबीर पूर्ण शहरामधून आयोजित करून लातूरकरांना लसबाबत असणारी भिती,गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी व्यापक दृष्टीकोनातून जाणीव जागृती करावी त्याचप्रमाणे लातूर शहरातील बचत गटामधील दहा महिलांना ई-आटो (E-AUTO) चे वाटप केले जाणार आहे ज्या महिलांना ई-आटो (E-AUTO) घ्यावयाचा आहे त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधावा असे यावेळी आवाहन केले व लातूर शहरातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून या माध्यमातून केंद्रबिंदू मानून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा व या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावे अशा  सूचना मनपा अधिकाऱ्यांना केल्या,यावेळी नवनिर्माण वस्ती स्तर संघ व प्रगती वस्ती स्तर संघ यांना अनुक्रमे पन्नास हजाराचा फिरता निधी तर अकरा बचत गटांना अकरा लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले. या शिबिरासाठी स्थानिक मनपा सदस्या मा.पुजाताई पंचाक्षरी, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मदने, माविम चे समन्वयक मन्सूर पटेल,चंद्रकांत तोडकर,नितीन सुरवसे,विरेंद्र सातपुते,सचिन पांचाळ,स्वप्निल श्रीगिरी,सोनाली जाधव,शोभा वाकडे,शामल खराडे व बचत गट आणि वस्ती स्तर संघाच्या महिला उपस्थित होते तर या शिबिराचे नियोजन नवनिर्माण वस्ती स्तर संघ यांनी केले या कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थापक लक्ष्मण जाधव तर आभार शामा कुरील यांनी केले.

No comments:

Post a Comment